Posts

Showing posts from 2007

• मित्रा तू फक्त...

मित्र! मित्र या नावा पुढे एक वेगळच वलय असत...पण त्यातल्या एकाच नावा पुढे मन जोडलेल असतं..त्याच खास, खऱ्या मित्रा साठी.... मित्रा तू फक्त हात दाखव मीच तुला हात देईन मित्रा तू फक्त जीव लाव तूझ्यासाठी मीच जीव देईन. मित्रा तू फक्त हाक मार मी नक्की हजर असेन मित्रा तू फक्त नेहमी बोल नाहीतर मी नक्की कोलमडेन. मी चुकलो तरी एकदाच बघ मीच स्वःताहुन माफी मागेन तू चुकलास तरी एकदाच बघ मीच तुला माफ करेन. मित्रा तु फक्त गोड हस सारे श्रम शमतील मित्रा फक्त एक मिठी मार सगळी दुःख विसरतील. मित्रा फक्त तुझ्या आधारावर मी जीवन जगत असेन मित्रा तू फक्त आठवण ठेव नाहीतर जीवन जगणच सोडेल. -चैत.

• काय सांगु माझ्या बद्दल ?

काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय पोटच आमच भरत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही मांडायचा प्रयत्न करतोय पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. -चैत.

• अस हे स्वप्न स्वप्नच रहावं !!

Image
प्रस्तुत कवितेत त्याच्या आणि तिच्या मनातिल भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघेही एकमेकांची स्वप्न पहात असतात. स्वप्नातच भेटत असतात. पण कधी कधी ऐन रंगात आलेल स्वप्न.... स्वप्नच रहात....पण त्यातही एक प्रकारचा गोडवा असतो.. नही का? त्यामुळॆ नेहमीच वाटत रहात... अस हे स्वप्न स्वप्नच रहावं !! वाटतं सुंदर पिसा सारख वाऱ्यासंगे उडावं गार लहरीत डोळ्यांना मिटावं हात पसरून मन हलकं करावं शांत झोके खात मग खाली यावं तिच्या खांद्यावर डोकं ठेवावं तिनं मग त्याला हातात घ्यावं लागलं तर नाहीना म्हणत हळूवार फुंकरावं फिरवत हात मग कुरवाळत बसावं कुणी बघेल म्हणुन त्याला दडवावं पुस्तकात त्याला मग ठेवुन द्यावं रात्री झोपताना पुस्तक उघडावं डोळेभरुन त्याला पहावं त्याला बघता बघताच थोडसं हसावं हसता हसताच काहीतरी पुट्पुटावं नकळत डोळ्यांनाही ते जाणवावं डोळे बंद करुन ह्र्दयाशी धरावं ओठांवरुन त्याला अलगद फिरवावं "स्वप्नात येशील का?" म्हणुन त्याला विचारावं त्याचच स्वप्नात तिनं हरवावं त्याच्या बरोबर मग दुःख विसरावं डोक ठेवुन तिनं निर्भयपणे निजावं.. साखर झोपेत तिला कुणीतरी हलवावं गोड स्वप्न ते झपकन तुटावं...

• दिसतेस तु, मन बावरे होते तेंव्हा का बरे?

Image
(अरे मित्रा कुणी सांगेल का मला? मला हे काय होतय? तिला बघितल्या पासुन ही अशीच हालत आहे! माझी स्थिती अशी का झाल्येय? फक्त ती दिसते आणि.......) दिसतेस तु, मन बावरे होते तेंव्हा का बरे? भावना मनातुनी उफळती परी त्या का शब्दात ना उतरती? बद्ध झाली मय मती डोक्यात का काहीच ना शिरती? मन वेडे, फिरते अवतिभवती तू नसता का उगाच ते भिरभिरती? डोळे तुलाच ग शोधिती तुजसाठी का जागतो मी रती? माझे मलाच ना आकळती ऐसी का व्हावी मज स्थिती? (ती बघ ती येत्येय .......जा जा सांग जा! अरे जा सांग तुला काय काय होतय ! अरे गधड्या वेळ जाईल तोंड उघड आता. अरे वेड्या तुला काय झालं माहीत आहे का?.... ) मित्र सारखे मजला पिडती हे तर प्रेम असे का म्हणती? तु येता मला ते चिडवती वेळ जाईल,आता तरी तोंड उघड की ! (अच्छा हे प्रेम आहे तर! सांगु म्हणताय? पण फज झालं तर? बर...बर सांगतो! पण काय बोलु?.....भीती वाटते रे ! ) सांग तिला,वाढवुया आपण नाती देशील का हात तुझा ग हाती? पर सांगु कसे, वाटते मजला भिती तोची हात जर पडला गालावरती? (अता सांगतोस का? जा ना.....तु Tension घेवु नको आम्ही आहोत पाठी. जा सांग जा ती बघ आली ! जा.. जा रे!) एके दिवशी बळेच...

• मी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट !!

प्रस्तुत कवितेत एकेकाळच्या रंगभुमीच्या सम्राटाच झालेल अधःपतन दर्शवणाचा प्रयत्न केलाय. रंगभुमी...अनेक रंग दाखवणारी..भुरळ पाडणारी......आणि एकदा पडली की रंक ही राजा होतो....आणि रंगीत शाईत रंगुन जातो....आणि मग तोच राजा कधी रंक होतो त्याचे त्यालाच कळत नाही. दुर्दैवाने मायभुमीला असे अनेक अनभिषिक्त सम्राट मिळाले पण.... मी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट !! मी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट होऊन गेलो, आज मी रंगभूमीचा पडदा सरकवू लागलो. आधी होतकरूंसाठी मी आधारस्तंभ झालो, आज रस्त्यावरच्या खांबाच्या अधारी झोपलो. आधी शुन्यातुन अंक घड्वून गेलो, आज स्वःताच एक शून्य होऊन बसलो. आधी शिखरावर असताना गर्जून गेलो, आज मात्र पायथ्याशी लोळत पडलो. आधी दूसरयांच्या टाळ्या बनलो, आज दुसरयांसाठी टाळी वाजवू लागलो. आधी रंगभूमीत रंग उधळत रंगून गेलो, रंगीत शाईत मात्र स्वःताच बेरंग झालो. गर्वाच्या धुंदित बेधुंद झालो, शुद्धित आल्यावर शुद्धच हरपलो. पैशाच्या गुर्मित सगळ्यांना विसरलो, आठवताना त्यांना आज स्वःताच हरवलो. शिखरावर असताना कधी उतरलोच नाही, मनातून उतरल्यावर कधी चढलोच नाही. समोर दिसत असताना काही बघितलच नाही, डोळे उघड्ल्यावर क...

• कधी असं कधी तसं... ( एका एकतर्फी प्रेमाची कथा. )

Image
कधी असं कधी तसं... काहीही करुन तिच्या नजरेत भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चांगल्या तरुणाची ही प्रेम कथा. एकतरफी प्रेमाची हसरी गुंफण घालणारा हा एक प्रयत्न ! त्याने कितीही प्रयत्न केला तरी ......... कधी असं कधी तसं पण काय करणार ? Impression पडतच नाही कधी !! (कडव्यातील शब्द सलग म्हटलेत तर चांगली लय येइल...Brithless Song सारख.) कधी असं कधी तसं... !! कधी असं कधी तसं तुला चोरुन पहावं तू बघताच मग माग वळुन बघावं ! कधी असं कधी तसं तुझ्या संगती चालाव तू थांबताच मग म्होरं चालत रहावं ! कधी असं कधी तसं तुला बघुन हसावं मी बघताच तुला तू नाक मुरडावं ! कधी असं कधी तसं तुझ्या वाटेत थांबाव वाट बघत तुझी मी घर विसरुनी जावं ! कधी असं कधी तसं फार कूसं पालटावं कुणी मारताच हाकं खोट खोट ग निजावं ! कधी असं कधी तसं घरा इथुन फिरावं तु येताच बाहेर तुला हात ग जोडावं ! कधी असं कधी तसं तुझ्या बाबांनी बघावं त्यांनी येवुन तिथं माझा कान पेटवावं ! कधी असं कधी तसं तुला अखेर बघावं मान खालती घालुन मी पाठी परतावं ! कधी असं कधी तसं ते क्षण आठवावं आठवत तुला मग दोन अश्रू ग ढाळावं ! कधी असं कधी तसं मन फार हेलवावं ते हसत म्हणाव तु...

• या गोजीरवाण्या घरात !!

प्रस्तुत कवितेत एका विखुरलेल्य घराचे वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. आजी,आजोबा,काका काकु आणि आम्ही सगळे कसे आनंदात रहात होतो...पण काय झाले काही कळालेच नाही..गोकुळात लंका नांदायला लागली...आणि एक दिवस तो उजाडलाच बाहेर पडण्याचा...वेगळे होण्याचा. सादर करतोय.. या गोजीरवाण्या घरात !! एक गोजीरवाण घर होतं, आपलेपणातच सारं काही होत. घरात कसा माणसांचा रिघ असायचा, आज तो नावाला सुद्धा नसायचा. घराला घर म्हणायला काही हल्ली राहीलच नाही, चार भिंती शिवाय काही उरलच नाही. चार माणसं चार कोपऱ्यात, प्रत्येक जण आपल्याच तोऱ्यात. माणसां प्रमाणेच घराचे पोकळ वासे, घेत बसतात तेही मग उसासे. एक म्हणायच म्हणुन नावाला कुटुंब, बघितलकी चेहरे होतात अरुंद. पहाताना होत असलेल घर वेगळे, घराला जोडणारे खिळेही झालेत खिळखिळे. गेले.. ते सोनीयाचे दिवस गेले, देवाने ते आमच्या पासुन हीरावले. आईचा ओरड, काकुचा लाडु, आता कुणाकडे जाउन मागु. बाबांचा मार, धोपट पाठ, काकांच बक्षिस, थोपट पाठ. आजीच्या गोष्टीतला गोड मुका, मुकतोय त्याला, तोही झालाय मुका. घराला असायचा आजोबांचा भक्कम आधार, आज घरातच झालेत स्वःता ते निराधार. आजोबा म्हणतायत, आपलं सुख क...

• आहेस तू गरुड घे गरुड भरारी !!

Image
प्रस्तुत कवितेत व्यतिथ झालेल्या , दुःख सोसुन जखमी झालेल्या, जगण्याला कंटाळलेल्या आणि स्वःताचे अस्तित्वच हरुन बसलेल्या एका तरुणाला त्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी, त्याची योग्य जागा दाखवण्यासाठी एक आशावाद मांडाण्याचा प्रयत्न ... मयुराच्या सौंदऱ्यावार , त्याचा डौल पाहुन , मागुन फिरणाऱ्या लांडोरी बघुन त्याचा हेवा वाटणाऱ्या गुरुडाच्या माध्यमातुन केला आहे. आहेस तू गरुड घे गरुड भरारी ! फुलले जरी सुंदर हे पंख मयुरी उडता नच येती तया उंच आभाळी निर्बल झाले तव पंख हे जरी आहेस तू गरुड घे गरुड भरारी ! मोहक ते पंख मयुर हळुच पिसारी फिरती मागुन तया क्षुब्ध लांडोरी ते शोभती खचित पर तुज काय जरुरी आहेस तू गरुड घे गरुड भरारी ! गळीतमात्र होई तो अटकुनी पिंजरी अवजड होती तया पंख ते भारी भार तयांचाही मग तो न सावरी आहेस तू गरुड घे गरुड भरारी ! का उगाच करतो तु त्याची बरोबरी रडतो इथेच तो करुन मांजरी घर तुझे नव्हे इथे तिथेच अंबरी आहेस तू गरुड घे गरुड भरारी ! गडगडते मेघ तुज धाक दावती गुरगुरता पवन तुझा मार्ग आडवी जा निर्भय तु पुढे ना तयांना विचारी आहेस तू गरुड घे गरुड भरारी ! ना हो व्यथित हे तु न विसरी चित्त एकवटुनी तु...

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

Image
कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.कधी ते ओठांपर्यन्त येतात पण तिथेच अडतात. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही .असेचकाहीसे 'दुसरी'कडेही होत असेल..शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच... म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन ! किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन तोही गुलाब जाइल एक दिवस कोमेजुन राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन "थॅंक्स!" म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस थांबणार तू बोलल्या वाचुन ...

• असा तो एखादाच असतो !!

Image
असा तो एखादाच असतो ... जवळ नसुनही जवळचा वाटतो नबोलताच खुप काही सांगुन जातो मनातली सल मनातच ठेवत मनात कुठेतरी घर करुन जातो ! असा तो एखादाच असतो ... स्वःताच जग बदलुन जातो आठवणींच्या पाउलखुणाच मागेठेवुन जातो कधी आपणच त्या वाटेकडे बघत बसतो खुणांचा मागोसा घेत कुठे तरी हरवतो ! असा तो एखादाच असतो ... चुकल्या वाटेवर परत भेटतो क्षणभर आपणच मग बावचळतो डोळे बंद करुन त्याच्याकडे झेपावतो पण डोळे उघडताच स्वप्नभंग होतो ! असा तो एखादाच असतो .. स्वप्नातच तो आपल्याला हसवुन जातो आपणच मग आपल्याला सावरतो आरशात बघत स्वःतालाच विसरतो मात्र तो..सुख देवुन दुःख घेवुन जातो ! -चैत.

• बघता बघता वर्ष कसं गेल पटकन सरुन !! (The End of Collg Lif)

बघता बघता वर्ष कसं गेल पटकन सरुन, गेल मात्र हळुच आठवणी जुन्या देवुन. म्हणता म्हणता आला हा शेवटचा दिवस, खर सांगा, आठवलाना कॉलेजचा तो पहिला दिवस? म्हटलं सुटलो परीक्षा एकदाची संपली, हट्‌ऽऽ यार मजेलाही ती सोबत घेवुन गेली. कॉलेजच्या जवळचा तो डांबरी रस्ता, अरे, पोट दुखायच तिथे हसता हसता. कुणाची तरी नोट त्याच्याच खिशातुन डोकवायची, हळुच काढुन त्याच्या सकट सगळ्यांना ए१ पार्टी द्यायची. फाईल कंप्लिशन्‌ला कुणाकडे तरी रात्र गाजवायची, येताना 'स्वदेस'ई स्टाईल मध्ये मग वरात निघायची. लेक्चरला असताना हळुच सरांची खेचायची, हांआ..मग परीक्षा आल्यावर आमचीच लागायची. स्टाफरुम मधे जावुन त्यांची माफी मागायची, येतो सर. प्लीझ, कृपा करा तेवढी मार्क वाढवायची. कधी लेक्चर ला कुणाची चप्पल लपवायची, रडीला आल्यावर मग समोर आणुन ठेवायची. नजरा चुकवत हळुच तिला बघायची, ति मात्र तिला अचुक हेरायची. डेज्‌ मधे तिच्याशी फ्रेन्डशिप कारायाची , डीजे मधे मग जरा जवळीक व्हायची. हाय डिअर म्हणुन तिला हाक मारायची, हेलॊ ब्रदर म्हणुन आमचाच ती पोपट करायची. म्हणुनच की काय आमच्या टीम मध्ये कोणी 'मंदिरा' नसायची, शेवटीला टिटवाळ्याच...

• मी एक Veriable आहे !!

मी एक Veriable आहे, तुम्ही द्याल ते Lable आहे, शुन्यानेच माझी Initial आहे, तरीही मी Unstable आहे. मी एक Veriable आहे, कधी Pluse कधी Minus आहे, चिडलो तर Virus आहे, तरीही खूप Syrus आहे. मी एक Veriable आहे, तुमच्या Programa चा मेन Actor आहे, छोटसं Charachtaer आहे, पण खूप मोठा Factor आहे. मी एक Veriable आहे, कधी बाहेर कधी आत Declearation आहे, मधेच एखादी जरतर Condition आहे, फक्त तिच्यासाठीच माझं Circulation आहे. मी एक Veriable आहे, माझं आयुष्य फक्त एक Run आहे, जेवढा वेळ तेवढाच Fun आहे, कारण मी सुद्धा एक Human आहे. -चैत.

• आपल्याला पण एक मैत्रिण असावी!

Image
आपल्याला पण एक मैत्रिण असावी! समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी, बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी. चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी, घर जवळ येताच पुढे निघून जावी. आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी, दिसलो की गालवर छान खळी पडावी. कधी हसता हसताच ती रडावी, कधी रडता रडताच खुद्कन हसावी. हक्काने आपल्यावर रागवावी, मग कही न बोलताच निघून जावी. नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी, आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी. सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी, निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी. लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी, वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी. ती आनंदात असली की घडघडुन बोलावी, नाहीतर थोडीशी अबॊल रहावी. सुखात सगळ्यांना सामिल करावी, व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी. बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी, आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी. परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी, "साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी. थोडा वेळ मग ती शांत रहावी, पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी. ती बरोबर असली की आधार वाटावी, अशीही मैत्र...

• आनंदी आनंदे...ते चारोळे

आनंदीला आनंद म्हणे, जाऊ नको तू ये ईकडे, पाहू नको तू चोहीकडे, आपण खाऊ हे चारोळे. आनंदी लाडात म्हणे, बाजुला आहेत 'कावळे', बघुन त्यांना मी घाबरते, कसे खाऊ मी हे चारोळे. मी असता तू का घाबरते, चल जाऊ आपण दुसरीकडे, तिथे न तु त्यांना दीसे, मग खाऊ आपण हे चारोळे. नको नको आतां राहुंदे, झाली वेळ आता मी निघते, उद्या भेटु आपण मग तिकडे, मग खाऊ हे चारोळे. उद्या म्हणता दिवस सरले, रोज नवीन तिचे बहाणे, त्याचे त्यालाच कळून चूकले, आपणच खाल्ले...... ते चारोळे! -चैत

• हत्‌ तिच्या मारी..... थोडक्यासाठी गाडी चुकली!!!

Image
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली मी दिसताच चालता चालता जरा थांबली माझ्याकडे बघुन गोड हसली ओठांची मोहोळ खुलली.. म्हटलं पोरगी बहुतेक पटली पण..हत तिच्या मारी मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली. त्यादिवशी ती वर्गात आली येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली माझ्या अंगावर कशी शहारी पसरली बोलाण्यासाठी जीभ सरसावली.. पण.. हत तिच्या मारी काही बोलणार इतक्यातच म्हणाली "प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली." एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली पाठुनच तिनं एक हाक मारली उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली "थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली.. पण.. हत तिच्या मारी गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली. शेवटी मनाची तयारी केली शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली गालावरची खळी पाहीली.. वाटल बहुतेक देवी पावली पण..हत तिच्या मारी म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली.." -चैत.

• बटाट्याची बिल्डिंग भाग-३

लुकलुकणारे डोळे सर्व काही सांगुन गेले, "आता परत कधी येणार?" नबोलताच विचारुन गेले. "नक्की येत राहीन!" म्हणुन पाया पडलो, निःस्वार्थ आशिर्वादाची शिदोरी घेऊन बाहेर आलो. आम्ही चाळ सोडली तेंव्हा ही मंडळी पार स्टेशना पर्यंत आली, आशाळभुतपणे त्यांची मजल आज जिन्यापर्यंतच पोहोचली. जिन्यातून उतरताना मागे बघु लागलो, लाकडी माडीवर जगलेले दिवस पाहू लागलॊ. चाळीत नेहमी कसा गजबजाट असायचा, आज फक्त ईथे शुकशुकाट पहायचा. पाहटे पहाटेच कुजबुजायला लागायची चाळ, बिल्डिंगची आज होतच नाही सकाळ. पहाटेसच अक्कामाईंच्या भुपाळीचा दरवळायचा नाद, दडपला जातो तो आज घोरणारया पंपाच्या आवाजात. दुपारी काकुंच्या मदतीला येत शेजारच्या मामी, जगा चालवतात आज 'मानसी' कींवा 'सखी'. रात्री माडीवर चढायचा गप्पांना रंग, टीव्ही बघण्यात इथला माणुस आज होतो दंग. कूणाच पोर कुणाकडे भरपेट जेवायच, "यादराख! कुणाकडे काही खाल्लस तर" म्हणुन त्याला आज दरडवायच. चाळीत कुणाच्या सुखात आनंद नांदायच घराघरात, कुणाच्या दुःखात सुतक असायच प्रत्येक घरात. आज दुःखात जरी असला मदतीचा हात, तरी सुख मात्र राहत उंबरठ्याच्या आत. ...

• बटाट्याची बिल्डिंग भाग-२

या या स्वागत आहे! पहील्या मजल्यावरचे हे श्री व सौ साने, दोघां व्यतिरीक्त बाकी घर तसे असते रिकामे, सून आणि डॉ. साने असतात कंट्रि आऊट, दोघा म्हातारयांचा मात्र असतो नेहमी शाऊट. समोरच्याच खोलीतल्या या प्रेमळ अक्काताई, सोबतीला असतात त्यांच्या हल्ली मोलकरीणबाई, म्हणतात सकाळी जेंव्हा त्या गोड भूपाळी, तेंव्हाच कळंत का म्हणतात त्यांना आनंदीमाई. दूसरया मजल्यावरचे स्वा. से. दत्ताराम दामले, खोलीत वारले ते दोन दिवसांनी सगळ्यांना कळले, मूलांना कळवले तरी कार्य मात्र बिल्डिंगलाच करावे लागले, दहाव्यालाही 'त्या' कावळ्यांनी बहुतेक यायचे टाळले. असो, तिसरया मजल्यावरचे हे मास्तर चितळे, छडीची जागा आता घेतली आहे काठीने, घरात जरी नसले शेंगदाणे तरी डोळ्यात दिसतात मोत्याचे दाणे, नमःस्कार करून निघताना तेच डोळे मात्र पाणावले. शेवट्च्या मजल्यावरचे सगळ्यांचे लाडके आबा टिपरे, ८९ नॉटाऊट तरीही ठणठणीत उभे, संस्कार आणि आसने अजूनही करतात ते नित्यनियमाने, म्हणुनच की काय सुखालाही वाटतय रहावस त्यांच्याकडे! अशी ही बघताना रूक्ष वाटणारी जुनी माणंस, त्यांच्याशी बोलल्यावर मात्र कळत ही आहेत गोड फणंस. म्हणतात भेटायला येतच न...

• बटाट्याची बिलडिंग भाग-१

होती इथे आधी हसरी बटाट्याची चाळ, बांधल्येय आता बिल्डिंग मजली चार. हा आमचा वॉचमेन आहे, वॉच वुमेन हे त्याच दूसरे काम आहे. तशी त्याची काही गरज नाही, कारण कोणीच इकडे फिरकत नही. बिल्डिंगचे दरवाजे असतात नेहमी बंद, त्यामूळे कुणाचाच कुणाशी फारसा नसतो संबंध. पूर्वीच्या चाळीतले दात सगळे पड्लेत, दाढाच मात्र काही शिल्लक आहेत. काही किड्ल्यात काही हलायच बघतायत, तरीही गप्प बसून कळा सहन करतायत. चला तर मग ओळख देतो त्यांना तुमची करुन, बरयाच दिवसांनी कोणी आल म्हणुन उर येइल त्यांच भरुन. श्री व सौ साने;आनंदीताई प्रभूणे, स्वातंत्र्य सेनानी दत्ताराम दामले, हातातल्या छडीचा कधीही उपयोग न करणारे मास्तर चितळे, आणि हो आपले लाडके आबा...आबा टिपरे, पुढ्ल्या भागात आपल्याला ते भेट्णारेत, चार गोष्टी आपल्याला ते सांगणारेत. (भेटूया बटाट्याची बिल्डिंग- दूसरया भागात) ........ -चैत.

• 'लव' की प्रेम?

Image
'लव' शब्दच कीती पोकळ, 'प्रेम' शब्दातच कीती बळ. 'लव' एक बेछुट अंधानुकरण, 'प्रेम' एक अतुट बंधन. 'लव' मनांची फ़सवणुक, 'प्रेम' मनांची जपणूक. 'लव' कोमेजलेला गंध, 'प्रेम' दर्वळलेला सुगंध. 'लव' नसमजून बोलणं, 'प्रेम' नबोलून समजणं. 'लव' मेसेज सरकवणं, 'प्रेम' मेसेज बनणं. 'लव' आंधळ करतं, 'प्रेम' बघायला शिकवतं. म्हणूनच, 'प्रेम' नसलं तर काहीच नसतं, 'प्रेम' असलं तर जग असतं. तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय? 'लव' की 'प्रेम'! -चैत

• स्वप्न !

Image
स्वप्न एक रत्न असतं, देवा ने दिलेल वरदान असतं ! स्वप्न एक चित्र असतं, आपणच आपले एक पात्र असतं ! स्वप्न एक जग असतं, आपणाच रंगवलेल एक विश्व असतं ! स्वप्न एक जागा असते, त्यात पडुन सुद्धा ईजा नसते ! स्वप्न एक सुःख असतं, दुःख विसरायच औषध असतं ! स्वप्न एक विचार असतॊ, भविष्य घडवण्याचा मार्ग असतो ! असं हे स्वप्न नेमके कुठे असतं? कोणी म्हणते ते डोळ्यात असतं,कोणी म्हणते ते मनात असतं, त्या 'गुरु' ला विचारा,तो म्हणेल ते हातात असतं ! -चैत.