Posts

Showing posts from February, 2008

• सालं आपल नशिबच फुटकं... आपल्या बाबतीत हे असच चालायचं...

लहान भावने चिडवायचं मी फक्त त्याला ओरडायचं आईने ऐकल की मलाच दणकवायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत हे असच चालायच... मोठ्या बहिणिला लाड लाड लाडवायचं हव नको ते सगळ पुरवायचं आम्हाला मात्र थोडक्यातच भागवायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत हे असच चालायच... नवीन बाईक साठी बाबांना कटवायचं निकाल लागल्यावर सगळच बोंबलायचं जुन्या सायकलवरुनच मग फिरायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत हे असच चालायचं... सिग्नलला बाईक वरच्या युगुलाला बघायचं त्यांनी खिदळत टाटा करुन खिजवायचं सायकलला सिटच नाही म्हणत आतुन आतुनच जळायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत हे असच चालायचं... स्टेशनवर एक फुलपाखरु बस मधे चढायचं आमच्या शेजारी बसता बसता उठायचं शेजारी मात्र बोजड ओंडकं येवुन बसायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत हे असच चालायचं... धाडस करुन तिला विचारयचं नाही म्हणत तिनं चांगलच ठुकरायचं आमच्याच हाताने आम्ही गाल चोळतच बसायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत हे असच चालायचं... वर्गात कुणी तरी मुद्दाम ओरडायचं मीच तो असं सरांना वाटायचं नाचक्की करुन मला बाहेर हाकलवायचं सालं आपल नशिबच फुटकं आपल्या बाबतीत ह