• अस हे स्वप्न स्वप्नच रहावं !!
प्रस्तुत कवितेत त्याच्या आणि तिच्या मनातिल भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
दोघेही एकमेकांची स्वप्न पहात असतात. स्वप्नातच भेटत असतात. पण कधी कधी ऐन रंगात आलेल
स्वप्न.... स्वप्नच रहात....पण त्यातही एक प्रकारचा गोडवा असतो.. नही का?
त्यामुळॆ नेहमीच वाटत रहात...
अस हे स्वप्न स्वप्नच रहावं !!
वाटतं सुंदर पिसा सारख वाऱ्यासंगे उडावं
गार लहरीत डोळ्यांना मिटावं
हात पसरून मन हलकं करावं
शांत झोके खात मग खाली यावं
तिच्या खांद्यावर डोकं ठेवावं
तिनं मग त्याला हातात घ्यावं
लागलं तर नाहीना म्हणत हळूवार फुंकरावं
फिरवत हात मग कुरवाळत बसावं
फिरवत हात मग कुरवाळत बसावं
कुणी बघेल म्हणुन त्याला दडवावं
पुस्तकात त्याला मग ठेवुन द्यावं
रात्री झोपताना पुस्तक उघडावं
डोळेभरुन त्याला पहावं
त्याला बघता बघताच थोडसं हसावं
हसता हसताच काहीतरी पुट्पुटावं
नकळत डोळ्यांनाही ते जाणवावं
डोळे बंद करुन ह्र्दयाशी धरावं
ओठांवरुन त्याला अलगद फिरवावं
"स्वप्नात येशील का?" म्हणुन त्याला विचारावं
त्याचच स्वप्नात तिनं हरवावं
त्याच्या बरोबर मग दुःख विसरावं
डोक ठेवुन तिनं निर्भयपणे निजावं..
साखर झोपेत तिला कुणीतरी हलवावं
गोड स्वप्न ते झपकन तुटावं
पुस्तकात बघत तिनं हसत हसत म्हणावं
अस हे स्वप्न स्वप्नच रहावं...
-चैत.
Comments