• मित्रा तू फक्त...
मित्र! मित्र या नावा पुढे एक वेगळच वलय असत...पण त्यातल्या एकाच नावा पुढे मन जोडलेल असतं..त्याच खास, खऱ्या मित्रा साठी....
मित्रा तू फक्त हात दाखव
मीच तुला हात देईन
मित्रा तू फक्त जीव लाव
तूझ्यासाठी मीच जीव देईन.
मित्रा तू फक्त हाक मार
मी नक्की हजर असेन
मित्रा तू फक्त नेहमी बोल
नाहीतर मी नक्की कोलमडेन.
मी चुकलो तरी एकदाच बघ
मीच स्वःताहुन माफी मागेन
तू चुकलास तरी एकदाच बघ
मीच तुला माफ करेन.
मित्रा तु फक्त गोड हस
सारे श्रम शमतील
मित्रा फक्त एक मिठी मार
सगळी दुःख विसरतील.
मित्रा फक्त तुझ्या आधारावर
मी जीवन जगत असेन
मित्रा तू फक्त आठवण ठेव
नाहीतर जीवन जगणच सोडेल.
-चैत.
Comments