• बटाट्याची बिल्डिंग भाग-२

या या स्वागत आहे!

पहील्या मजल्यावरचे हे श्री व सौ साने,
दोघां व्यतिरीक्त बाकी घर तसे असते रिकामे,
सून आणि डॉ. साने असतात कंट्रि आऊट,
दोघा म्हातारयांचा मात्र असतो नेहमी शाऊट.

समोरच्याच खोलीतल्या या प्रेमळ अक्काताई,
सोबतीला असतात त्यांच्या हल्ली मोलकरीणबाई,
म्हणतात सकाळी जेंव्हा त्या गोड भूपाळी,
तेंव्हाच कळंत का म्हणतात त्यांना आनंदीमाई.

दूसरया मजल्यावरचे स्वा. से. दत्ताराम दामले,
खोलीत वारले ते दोन दिवसांनी सगळ्यांना कळले,
मूलांना कळवले तरी कार्य मात्र बिल्डिंगलाच करावे लागले,
दहाव्यालाही 'त्या' कावळ्यांनी बहुतेक यायचे टाळले.

असो, तिसरया मजल्यावरचे हे मास्तर चितळे,
छडीची जागा आता घेतली आहे काठीने,
घरात जरी नसले शेंगदाणे तरी डोळ्यात दिसतात मोत्याचे दाणे,
नमःस्कार करून निघताना तेच डोळे मात्र पाणावले.

शेवट्च्या मजल्यावरचे सगळ्यांचे लाडके आबा टिपरे,
८९ नॉटाऊट तरीही ठणठणीत उभे,
संस्कार आणि आसने अजूनही करतात ते नित्यनियमाने,
म्हणुनच की काय सुखालाही वाटतय रहावस त्यांच्याकडे!


अशी ही बघताना रूक्ष वाटणारी जुनी माणंस,
त्यांच्याशी बोलल्यावर मात्र कळत ही आहेत गोड फणंस.

म्हणतात भेटायला येतच नाही कोणी मूळी,
मग काय खिडकीतून बघत बसतात कूठेतरी त्या आभाळी.

आठवण जरी येत असली त्यांना चाळीतल्या दिवसांची,
तरी मोजणी मात्र करतात ते उरलेल्या चार दिवसांची.

आज सवय करून घेतलेय त्यांनी ऍड्जेस्ट्मेन्ट्ची,
आतूरतेने वाट मात्र बघतायत नव्या 'रीप्लेसमेन्ट्ची'!

..........


-चैत.

Comments

Popular posts from this blog

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

• आनंदी आनंदे...ते चारोळे