Posts

Showing posts from April, 2007

• हत्‌ तिच्या मारी..... थोडक्यासाठी गाडी चुकली!!!

Image
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली मी दिसताच चालता चालता जरा थांबली माझ्याकडे बघुन गोड हसली ओठांची मोहोळ खुलली.. म्हटलं पोरगी बहुतेक पटली पण..हत तिच्या मारी मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली. त्यादिवशी ती वर्गात आली येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली माझ्या अंगावर कशी शहारी पसरली बोलाण्यासाठी जीभ सरसावली.. पण.. हत तिच्या मारी काही बोलणार इतक्यातच म्हणाली "प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली." एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली पाठुनच तिनं एक हाक मारली उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली "थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली.. पण.. हत तिच्या मारी गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली. शेवटी मनाची तयारी केली शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली गालावरची खळी पाहीली.. वाटल बहुतेक देवी पावली पण..हत तिच्या मारी म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली.." -चैत.

• बटाट्याची बिल्डिंग भाग-३

लुकलुकणारे डोळे सर्व काही सांगुन गेले, "आता परत कधी येणार?" नबोलताच विचारुन गेले. "नक्की येत राहीन!" म्हणुन पाया पडलो, निःस्वार्थ आशिर्वादाची शिदोरी घेऊन बाहेर आलो. आम्ही चाळ सोडली तेंव्हा ही मंडळी पार स्टेशना पर्यंत आली, आशाळभुतपणे त्यांची मजल आज जिन्यापर्यंतच पोहोचली. जिन्यातून उतरताना मागे बघु लागलो, लाकडी माडीवर जगलेले दिवस पाहू लागलॊ. चाळीत नेहमी कसा गजबजाट असायचा, आज फक्त ईथे शुकशुकाट पहायचा. पाहटे पहाटेच कुजबुजायला लागायची चाळ, बिल्डिंगची आज होतच नाही सकाळ. पहाटेसच अक्कामाईंच्या भुपाळीचा दरवळायचा नाद, दडपला जातो तो आज घोरणारया पंपाच्या आवाजात. दुपारी काकुंच्या मदतीला येत शेजारच्या मामी, जगा चालवतात आज 'मानसी' कींवा 'सखी'. रात्री माडीवर चढायचा गप्पांना रंग, टीव्ही बघण्यात इथला माणुस आज होतो दंग. कूणाच पोर कुणाकडे भरपेट जेवायच, "यादराख! कुणाकडे काही खाल्लस तर" म्हणुन त्याला आज दरडवायच. चाळीत कुणाच्या सुखात आनंद नांदायच घराघरात, कुणाच्या दुःखात सुतक असायच प्रत्येक घरात. आज दुःखात जरी असला मदतीचा हात, तरी सुख मात्र राहत उंबरठ्याच्या आत.