• बटाट्याची बिल्डिंग भाग-३

लुकलुकणारे डोळे सर्व काही सांगुन गेले,
"आता परत कधी येणार?" नबोलताच विचारुन गेले.
"नक्की येत राहीन!" म्हणुन पाया पडलो,
निःस्वार्थ आशिर्वादाची शिदोरी घेऊन बाहेर आलो.
आम्ही चाळ सोडली तेंव्हा ही मंडळी पार स्टेशना पर्यंत आली,
आशाळभुतपणे त्यांची मजल आज जिन्यापर्यंतच पोहोचली.
जिन्यातून उतरताना मागे बघु लागलो,
लाकडी माडीवर जगलेले दिवस पाहू लागलॊ.

चाळीत नेहमी कसा गजबजाट असायचा,
आज फक्त ईथे शुकशुकाट पहायचा.
पाहटे पहाटेच कुजबुजायला लागायची चाळ,
बिल्डिंगची आज होतच नाही सकाळ.
पहाटेसच अक्कामाईंच्या भुपाळीचा दरवळायचा नाद,
दडपला जातो तो आज घोरणारया पंपाच्या आवाजात.
दुपारी काकुंच्या मदतीला येत शेजारच्या मामी,
जगा चालवतात आज 'मानसी' कींवा 'सखी'.
रात्री माडीवर चढायचा गप्पांना रंग,
टीव्ही बघण्यात इथला माणुस आज होतो दंग.
कूणाच पोर कुणाकडे भरपेट जेवायच,
"यादराख! कुणाकडे काही खाल्लस तर" म्हणुन त्याला आज दरडवायच.
चाळीत कुणाच्या सुखात आनंद नांदायच घराघरात,
कुणाच्या दुःखात सुतक असायच प्रत्येक घरात.
आज दुःखात जरी असला मदतीचा हात,
तरी सुख मात्र राहत उंबरठ्याच्या आत.
चाळीत एक आपलेपणा असायचा,
आज मात्र त्याचा कोरडा दुष्काळ बघायचा.
पुर्ण चाळ एक कुटूंब असायच,
आज कुटुंबाला कुटुंब कस म्हणायच?

खाली उतरलो नावांची पाटी दिसली,
चाळीला त्याची गरजच कधी नाही भासली.
आपली चाळ कुणीतरी चोरली,आपल्या चाळीला कुणाची तरी द्रुष्ट लागली.
विचारात बाहेर कधी पडलो काही कळालेच नाही,
मागे वळुन बघितल म्हटलं "आपली चाळ आता उरलीच नाही!"

खरं सांगतो मित्रांनो "बटाट्याच्या चाळीची" सर,
'ही'ला कधीही येणार नाही.



-चैत.

Comments

Popular posts from this blog

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

• आनंदी आनंदे...ते चारोळे