• 'लव' की प्रेम?
'लव' शब्दच कीती पोकळ,
'प्रेम' शब्दातच कीती बळ.
'लव' एक बेछुट अंधानुकरण,
'प्रेम' एक अतुट बंधन.
'लव' मनांची फ़सवणुक,
'प्रेम' मनांची जपणूक.
'लव' कोमेजलेला गंध,
'प्रेम' दर्वळलेला सुगंध.
'लव' नसमजून बोलणं,
'प्रेम' नबोलून समजणं.
'लव' मेसेज सरकवणं,
'प्रेम' मेसेज बनणं.
'लव' आंधळ करतं,
'प्रेम' बघायला शिकवतं.
म्हणूनच,
'प्रेम' नसलं तर काहीच नसतं,
'प्रेम' असलं तर जग असतं.
तेंव्हा बघा तुम्हाला काय दिसतंय?
'लव' की 'प्रेम'!
-चैत
Comments