• असा तो एखादाच असतो !!
असा तो एखादाच असतो ...
जवळ नसुनही जवळचा वाटतो
नबोलताच खुप काही सांगुन जातो
मनातली सल मनातच ठेवत
मनात कुठेतरी घर करुन जातो !
असा तो एखादाच असतो ...
स्वःताच जग बदलुन जातो
आठवणींच्या पाउलखुणाच मागेठेवुन जातो
कधी आपणच त्या वाटेकडे बघत बसतो
खुणांचा मागोसा घेत कुठे तरी हरवतो !
असा तो एखादाच असतो ...
चुकल्या वाटेवर परत भेटतो
क्षणभर आपणच मग बावचळतो
डोळे बंद करुन त्याच्याकडे झेपावतो
पण डोळे उघडताच स्वप्नभंग होतो !
असा तो एखादाच असतो ..
स्वप्नातच तो आपल्याला हसवुन जातो
आपणच मग आपल्याला सावरतो
आरशात बघत स्वःतालाच विसरतो
मात्र तो..सुख देवुन दुःख घेवुन जातो !
-चैत.
Comments