• आहेस तू गरुड घे गरुड भरारी !!
प्रस्तुत कवितेत व्यतिथ झालेल्या , दुःख सोसुन जखमी झालेल्या, जगण्याला कंटाळलेल्या आणि स्वःताचे
अस्तित्वच हरुन बसलेल्या एका तरुणाला त्याचे अस्तित्व दाखवण्यासाठी, त्याची योग्य जागा दाखवण्यासाठी एक आशावाद मांडाण्याचा प्रयत्न ...
मयुराच्या सौंदऱ्यावार , त्याचा डौल पाहुन , मागुन फिरणाऱ्या लांडोरी बघुन त्याचा हेवा वाटणाऱ्या गुरुडाच्या माध्यमातुन केला आहे.
मयुराच्या सौंदऱ्यावार , त्याचा डौल पाहुन , मागुन फिरणाऱ्या लांडोरी बघुन त्याचा हेवा वाटणाऱ्या गुरुडाच्या माध्यमातुन केला आहे.
आहेस तू गरुड घे गरुड भरारी !
फुलले जरी सुंदर हे पंख मयुरी
उडता नच येती तया उंच आभाळीनिर्बल झाले तव पंख हे जरी
आहेस तू गरुड घे गरुड भरारी !
मोहक ते पंख मयुर हळुच पिसारी
फिरती मागुन तया क्षुब्ध लांडोरीते शोभती खचित पर तुज काय जरुरी
आहेस तू गरुड घे गरुड भरारी !
गळीतमात्र होई तो अटकुनी पिंजरी
अवजड होती तया पंख ते भारी
भार तयांचाही मग तो न सावरीआहेस तू गरुड घे गरुड भरारी !
का उगाच करतो तु त्याची बरोबरी
रडतो इथेच तो करुन मांजरीघर तुझे नव्हे इथे तिथेच अंबरी
आहेस तू गरुड घे गरुड भरारी !
गडगडते मेघ तुज धाक दावती
गुरगुरता पवन तुझा मार्ग आडवीजा निर्भय तु पुढे ना तयांना विचारी
आहेस तू गरुड घे गरुड भरारी !
ना हो व्यथित हे तु न विसरी
चित्त एकवटुनी तु पंख पसारीतुज पाठी आहे तो एक श्रीहरी
आहेस तू गरुड घे गरुड भरारी !
-चैत.
Comments