• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!





कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.कधी ते ओठांपर्यन्त येतात पण तिथेच अडतात. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही .असेचकाहीसे 'दुसरी'कडेही होत असेल..शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच...

म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !


किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तोही गुलाब जाइल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
"थॅंक्स!" म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


किती दिवस थांबणार तू बोलल्या वाचुन
एक दिवस येशील एकटं तिला गाठुन
रडतच निघेल ती पत्रिका हातात देवुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


जाशील लग्नाला शेवटच बघायला म्हणुन
मारशील तू अक्षता नवऱ्याला फेकुन
बघशील तेंव्हाही तिला चोरुन चोरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !


कधी तरी दिसशील तु तीला रस्त्या वरुन
थांबवेल तेंव्हा तुला ती एक हाक मारुन
विसरशील तू स्वःतालाच तिचं बाळ पाहुन
तीच म्हणेल तेंव्हा तुला
"एकदातरी...
बघायच होतस मला सांगून !!"

म्हणूनच म्हणतो,

वेळे आधीच गड्या दे लाज सोडुन
सांग तिच्या नजरेला नजर तू देवुन
हात तिचा तुझ्या हातात तू घेवुन
मांड तुझ्या भावना तिला तू कळवळून
बघेल जेंव्हा तुला ती डोळे भरुन
मिठी मारेल तुला तेव्हा ती कळकळून!

एकदातरी.. बघ तिला सांगून !!


-चैत.

Comments

Anonymous said…
Kavita mast aahe re.. ektarfi prem aslelyala ekdam chaprak deiil ashi..
fakhta shevatache kadave thode vegale vaatle.. jithe tu gadyla laaj sodayla sangun propse karyla saangtos na.. tithe..
majhya mate gadee lajat nasto tar ghabarat asto.. mee tila vicharle aani ti nahi mhanali tar? kinva yanantar tee majhyashee maitri thevel ka nahi? ase asankhya prashna tyachya manat astaat.. mhanun to tila lavkar saangat nahi..
ofcourse he majhe mat aahe.. itaransathi te vegalehi asu shakel..
but all in all a very good n precise poem.. kuthe kami nahi aani jaast nahi.. kavita ekdam jhakaas jhaaliye..
- sandeep
Unknown said…
Hi

Miii Amit Adkar, Sandeep Mestry cha mitra, and i am totally agree with what sandeep says, kii toh lajat nahi tar ghabarato..but poem is superb.

Amit Adkar

Popular posts from this blog

• आनंदी आनंदे...ते चारोळे