• बटाट्याची बिलडिंग भाग-१

होती इथे आधी हसरी बटाट्याची चाळ,
बांधल्येय आता बिल्डिंग मजली चार.
हा आमचा वॉचमेन आहे,
वॉच वुमेन हे त्याच दूसरे काम आहे.
तशी त्याची काही गरज नाही,
कारण कोणीच इकडे फिरकत नही.
बिल्डिंगचे दरवाजे असतात नेहमी बंद,
त्यामूळे कुणाचाच कुणाशी फारसा नसतो संबंध.
पूर्वीच्या चाळीतले दात सगळे पड्लेत,
दाढाच मात्र काही शिल्लक आहेत.
काही किड्ल्यात काही हलायच बघतायत,
तरीही गप्प बसून कळा सहन करतायत.
चला तर मग ओळख देतो त्यांना तुमची करुन,
बरयाच दिवसांनी कोणी आल म्हणुन उर येइल त्यांच भरुन.
श्री व सौ साने;आनंदीताई प्रभूणे,
स्वातंत्र्य सेनानी दत्ताराम दामले,
हातातल्या छडीचा कधीही उपयोग न करणारे मास्तर चितळे,
आणि हो आपले लाडके आबा...आबा टिपरे,
पुढ्ल्या भागात आपल्याला ते भेट्णारेत,
चार गोष्टी आपल्याला ते सांगणारेत.
(भेटूया बटाट्याची बिल्डिंग- दूसरया भागात)
........


-चैत.

Comments

Anonymous said…
zabardast

Popular posts from this blog

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

• आनंदी आनंदे...ते चारोळे