• मी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट !!

प्रस्तुत कवितेत एकेकाळच्या रंगभुमीच्या सम्राटाच झालेल अधःपतन दर्शवणाचा प्रयत्न केलाय.

रंगभुमी...अनेक रंग दाखवणारी..भुरळ पाडणारी......आणि एकदा पडली की रंक ही राजा होतो....आणि
रंगीत शाईत रंगुन जातो....आणि मग तोच राजा कधी रंक होतो त्याचे त्यालाच कळत नाही.
दुर्दैवाने मायभुमीला असे अनेक अनभिषिक्त सम्राट मिळाले पण....


मी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट !!


मी रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट होऊन गेलो,
आज मी रंगभूमीचा पडदा सरकवू लागलो.

आधी होतकरूंसाठी मी आधारस्तंभ झालो,
आज रस्त्यावरच्या खांबाच्या अधारी झोपलो.

आधी शुन्यातुन अंक घड्वून गेलो,
आज स्वःताच एक शून्य होऊन बसलो.

आधी शिखरावर असताना गर्जून गेलो,
आज मात्र पायथ्याशी लोळत पडलो.

आधी दूसरयांच्या टाळ्या बनलो,
आज दुसरयांसाठी टाळी वाजवू लागलो.

आधी रंगभूमीत रंग उधळत रंगून गेलो,
रंगीत शाईत मात्र स्वःताच बेरंग झालो.

गर्वाच्या धुंदित बेधुंद झालो,
शुद्धित आल्यावर शुद्धच हरपलो.

पैशाच्या गुर्मित सगळ्यांना विसरलो,
आठवताना त्यांना आज स्वःताच हरवलो.

शिखरावर असताना कधी उतरलोच नाही,
मनातून उतरल्यावर कधी चढलोच नाही.

समोर दिसत असताना काही बघितलच नाही,
डोळे उघड्ल्यावर काही दिसलच नाही.

आधी माझ्याशी स्पर्धा करायला कोणी धजलंच नाही,
आज मी स्पर्धेत उतरलोच नाही.

आज कोणीच मला ओळखणार नाही,
कारण स्वःतालाच मी आज ओळखत नाही!


-चैत.

Comments

Anonymous said…
Oi, achei teu blog pelo google tá bem interessante gostei desse post. Quando der dá uma passada pelo meu blog, é sobre camisetas personalizadas, mostra passo a passo como criar uma camiseta personalizada bem maneira. Até mais.
chetana said…
Its amazing Yaar!!!!!

Popular posts from this blog

• म्हणुनच म्हणतो एक्दातरी बघ तिला सांगुन !!

• आनंदी आनंदे...ते चारोळे